श्री. विशाल बंकर चौरे

श्री. विशाल बंकर चौरे ( प्रा.शि ) जिल्हा परिषद शाळा रांजणीपाडा ता. साक्री जि.धुळे 8275349861

नाविन्यपूर्ण उपक्रम


नाविन्यपूर्ण उपक्रम

                                                                  नाविण्यपूर्ण उपक्रम
                 शिक्षक स्वतः कल्पक असतात. शाळांमध्ये स्थानिक, भौगोलिक ,सामाजिक परिस्थिती स्तर विचारात घेऊन विविध उपक्रमांचे आयोजन करत असतात. या उपक्रमांमुळे शिक्षक –विद्यार्थी, शिक्षक-पालक व समाज यांच्यामधील सहसंबंध सकारात्मक होतात. मुलांची एकाग्रता वाढावी,त्यांना सलगपणे बसण्याची सवय लागावी यासाठी काही छोटे छोटे खेळ/उपक्रम घेता येतात. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते.त्याचा स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग होतो गावाला शाळा आपली वाटते व शाळेला गाव आपले वाटते.  पर्यायाने मुलांचा, शाळेचा आणि गावाचा विकास होतो.
    वर्षभरात तालुक्यातील सर्व जि.प.व्यवस्थापनाच्या शाळां खालील उपक्रम राबविणार आहेत.

                          1.दैनंदिन उपक्रम
 
1) मुलांचे वाढदिवस साजरा करताना पुस्तक भेट देणे/घेणे.
2) उपस्थिती ध्वज.
3) आजचे राजकुमार व राजकुमारी - स्वच्छ व टापटीप गणवेश इ.
4) गृहपाठ तपासणी रोज करून प्रोत्साहनपर 1 ते 5 स्टार देणे.
5) विदयार्थ्यांसाठी गृहपाठ डायरी विकसित करणे व पालकांची स्वाक्षरी घेणे.
6) मधल्या सुटटीत कवितांची/पाढयांची कॅसेट लाऊडस्पीकरवर लावणे.
7) वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे गायन करणे.
8) दररोज मुलांना उपयुक्त असे अवांतर वाचन करावयास पुस्तके उपलब्ध करून देणे.
9) शाळा सुटण्यापूर्वी दिवसभरातील घटकांचे  विदयार्थी शंकांचे निरसन करणे.
10) गुरूजनांना अभिवादन/ वर्गमित्रांसोबत हस्तांदोलन.

          2.साप्ताहिक उपक्रम :- 
 
    विशेष शनिवार मध्ये हे उपक्रम दिले आहेत.    

             3.सहशालेय /मासिक उपक्रम
 
 
अ.क्र
महिना
                    राबविण्याचे उपक्रम
1
जून
नवागतांचे स्वागतपालकसभा,राजमाता जिजाऊ पूण्यदिन,सामाजिक न्याय दिन 26जूनमातृपितृ दिन
2
जुलै
वृक्षारोपन व दिंडीगुरूपौर्णिमा,लोकसंख्या विस्फोट दिन 11 जूलैदिंडी सोहळा.
3
ऑगस्ट
छोटी परिसर सहल,स्वातंत्र्य दिन,रक्षाबंधन,गोपाळकाला,लोकमान्य टिळक पुण्यतिथी,आण्णाभाऊ साठे जयंती,ऑगस्ट क्रांती दिन
4
सप्टेंबर
शिक्षक दिनगणेशोत्सव,मातीचे गणपतीपावसाळी शालेय क्रिडा स्पर्धा,हिंदी दिन 14सप्टें.
5
ऑक्टोबर      
म.गांधी जयंती,भोंडला,विजयादशमी पाटीपूजन,संततुकडोजी महाराज पुण्यतिथी,शारदोत्सव साजरा करणे,मातीचे किल्ले ,आकाश कंदील.
6
नोव्हेंबर
यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी,बालदिन पं.नेहरू जयंती,म.फुले पुण्यतिथी,विज्ञान प्रदर्शन तयारी,बाजार
7
डिसेंबर
शैक्षणिक सहल,शिवप्रताप दिन,डॉ.आंबेडकर महानिर्वाण दिनविज्ञान प्रदर्शन भेट व नियोजनक्रिडास्पर्धा,भेटकार्ड तयार करणे.
8
जानेवारी
क्रां.सावित्रीबाईफुलेजयंती,प्रजासत्ताकदिन,सांस्कृतिककार्यक्रम,
तिळगूळ वाटपहळदी-कुंकू कार्यक्रमबालआनंद मेळावा.
9
फेब्रूवारी
शिवजयंती,मराठी राजभाषा दिवसविज्ञानदिन,किशोरी मेळावा,विज्ञान दिन.
10
मार्च
मार्च महिला दिन,10 मार्च सावित्रीबाई पुण्यतिथी,15 मार्च जागतिक ग्राहक दिन.


                         3. वार्षिक उपक्रम
 
1. गांडूळखत निर्मिती, परसबाग,तुळसबाग तयार करणे.
2. वृक्षारोपन,शेतीच्या कामात प्रत्यक्ष शेतक-यास मदत करणे ( मी शेतकरी)
3. पाण्याची  बचत, रेन हार्वेस्टींग ,पाणी शुध्दीकरण
4. सांस्कृतिक कार्यक्रम
5. हस्तलिखीत तयार करणे. ग्रंथ प्रदर्शन.
6. माझी बचत बँक.बँका,पोष्ट ऑफीस,पतपेढी भेट
7. शालेय लेझीम पथक.झंाजपथक, स्काऊट गाईड पथक.
10. शालेय गीतमंच.
11. FM band 101 वरील We Learn English हा कार्यक्रम ठिक 11.00
12.लेक शिकवा,लेक वाचवा अभियान.
13. विज्ञान प्रदर्शन ,विज्ञान जत्रा
14.विविध प्रकारच्या क्रिडास्पर्धा व क्रिडा प्रबोधनी.

No comments:

Post a Comment